June 2024

भाग – १० अ‍ॅनेस्थेशिया २

रुग्णांना लाफिंग गॅस देऊन अनेकांचे दात विनासायास उपटणाऱ्या डॉ. वेल्सला वाटलं की जोपर्यंत आपल्या संशोधनावर एखादा मान्यवर कौतुकाची मोहोर उमटवत नाही, तोपर्यंत आपल्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही. यासाठी त्याच्यापुढे बॉस्टनमधला सुप्रसिद्ध डॉक्टर जॉन वॉरेनचं नाव होतं. वॉरेनपर्यंत पोहोचण्यासाठी वेल्सनं आपला विद्यार्थी आणि आता सगळ्यांशी अतिशय धूर्तपणे गोडी गुलाबीचे संबंध ठेवणाऱ्या आणि दंतवैद्यकाचं काम करणाऱ्या विल्यम […]

भाग – १० अ‍ॅनेस्थेशिया २ Read More »

भाग – ०९ भूलीचा (ॲनेस्थेशियाचा) शोध

1840 सालाच्या अगोदर चक्क माणसांचे हातपाय बांधून शस्त्रक्रिया केल्या जात. त्यावेळी रुग्ण गुरासारखा ओरडे; कित्येकदा तो मरेही. किंबहुना शस्त्रक्रियांमध्ये होणाऱ्या वेदनाच इतक्या भयानक असायच्या की रुग्ण शस्त्रक्रिया न करुन घेता झालेल्या संसर्गामुळे किंवा आजारामुळे मरायचा मार्ग अनेकदा पत्करे! पूर्वीपासून वेदना कमी करण्यासाठी उपाय नव्हतेच असं नाही. मँड्रेक्स नावाची वनस्पती, अफू, कोकेन, मॉर्फिन वगैरेंचेही थोडेफार प्रयोग

भाग – ०९ भूलीचा (ॲनेस्थेशियाचा) शोध Read More »

भाग – ०८ हायड्रोफोबियाचा उपचार

वैद्यकशास्त्राचा इतिहास भयावह कथांनी भरलेला आहे. रेबीज किंवा हायड्रोफोबिया या आजाराचंच उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत या आजारामुळे १००% लोक मृत्यूमुखी पडत होते. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला काही दिवसांत कणकण येणं, भूक न लागणं, डोकेदुखी, मुंग्या येणं अशी लक्षणं दिसायला लगायची. त्यानंतर त्याला चाव्याच्या ठिकाणी वेदना व्हायला लागायच्या. यानंतर तो अस्वस्थ होणं, एका

भाग – ०८ हायड्रोफोबियाचा उपचार Read More »

भाग – ०७ विल्यम हार्वे आणि रक्ताभिसरण

प्राण्यांच्या आणि माणसांच्या शरीरातला रक्ताचा प्रवास याची देही याची डोळा पाहण्याची विलक्षण उर्मी ज्याला स्वस्थ बसू देत नव्हती असा विल्यम हार्वे (१ एप्रिल १५७८ -३ जून १६५७) नावाचा वैद्यकाचं शिक्षण घेणारा विद्यार्थी १५९९ पासून इटलीतल्या पडुआ विद्यापीठात शरीरशास्त्र आणि सर्जरी यांचे प्रयोग करत होता. ‘रक्त हृदयातून सोडलं जातं आणि ते चक्राकार पद्धतीनं शरीरात फिरत असतं’

भाग – ०७ विल्यम हार्वे आणि रक्ताभिसरण Read More »

भाग – ०६ व्हेसॅलियस

माणसाचा मृतदेह बघून कधी कुणाला आनंद होईल का? पण असा आनंद होणारा अँड्रियस व्हेसॅलियस (1514-1564) या नावाचा एक अजब माणूस खरंच होऊन गेला ! वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व्हेसॅलियसनं आपल्या वयाच्या 18व्या वर्षी ब्रसेल्स हे आपलं जन्मगाव सोडलं आणि पॅरिस गाठलं. तिथं त्याला शिकवायला सिल्व्हियस नावाचा गेलन या महान डॉक्टरचा शिष्य होता. सिल्व्हियसचा अर्थातच गेलनच्या तत्वांवर

भाग – ०६ व्हेसॅलियस Read More »

Scroll to Top