May 2024

भाग ५ – केमोथेरपीचा जन्म

एकोणिसावं शतक संपत आलं तेव्हा सगळीकडेच; विशेषत: युरोप, अमेरिका या ठिकाणी उद्योगांचं वारं वहायला लागलं होतं. इतर अनेक उद्योगांप्रमाणे कपड्यांना कृत्रिमरीत्या रंगवता येईल का यावरही वैज्ञानिक काम करत होते. त्याच वेळी पॉल अर्लिच हा वैद्यकाचा विद्यार्थी आपल्या प्रोजेक्टसाठी विषय शोधत होता. त्यावेळी कपड्यांना रंग देण्यासाठी अ‍ॅनिलिन डाय या नव्या कृत्रिम रंगाचा शोध लागला होता. हा […]

भाग ५ – केमोथेरपीचा जन्म Read More »

भाग ४ – अन्नपचन आणि ब्यूमाँट

आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं म्हणजे नेमकं काय होतं हा प्रश्न माणसाला मागची कितीतरी शतकं सतावत होता. एकोणिसाव्या शतकापर्यंत आपल्या पोटात काही अ‍ॅसिड्स असतात आणि काही पाचक रस असतात. त्यांच्यामुळे अन्न पचतं हे माहित झालं होतं. अन्नपचन कसं होतं या समस्येची उकल होण्याच्या इतिहासातली महत्वाची पण चमत्कारिक घटना एकोणिसाव्या शतकात घडली. त्याची ही गोष्ट !६

भाग ४ – अन्नपचन आणि ब्यूमाँट Read More »

भाग ३ – ब्लड लेटिंग

वैद्यकाच्या इतिहासात ‘ब्लडलेटिंग’ म्हणजे ‘रक्त वाहू देणं’ हा कोणत्याही रोग्याला बरं करण्यासाठी डॉक्टर मंडळींकडून केला जाणारा प्रथमोपचार होता आणि हा उपाय इतका क्रूर आणि भयंकर होता की त्यातून त्या रोग्याचा रोग बरा होणं हा निव्वळ अपघातानं घडलेला योगायोग असायचा. नाहीतर बऱ्याचदा अशी माणसं रोगापेक्षा या अघोरी उपचारानंच दगावायची.ब्लडलेटिंगमुळे रोग्याला आराम पडतो हे माणसाला का आणि

भाग ३ – ब्लड लेटिंग Read More »

भाग २ – चला हात धुवू या

काही कापल्यावर, पडल्यावर, लागल्यावर एखादी लहानशी जखम झाली तर आज आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही. पण दोनशे वर्षांपूर्वी अशी जखम मृत्यूचं कारण होऊ शकायची. पण हे समजणं त्याकाळी अवघड होतं. त्याच वेळी पारतंत्र्यात असलेल्या हंगेरीतला एक तरूण डॉक्टर आपल्यावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रियामध्ये काम करताना संसर्गजन्य रोगांच्या मुळाशी जाऊन त्यांचं कारण शोधणार होता. त्याचं नाव

भाग २ – चला हात धुवू या Read More »

भाग १ – प्रस्तावना

०१ विचित्र वैद्यक – प्रस्तावना (१७११२२)(८०५)वैज्ञानिक संशोधन ही एक अजबच गोष्ट आहे. त्यामध्ये शोधायला गेलो एक आणि हाती लागलं भलतंच असं अनेकदा होतं. जिथे जिथे माणसानं आपलं कुतुहल जागं ठेवून निरीक्षण केलं तिथे तिथे त्याला काहीतरी नवीन सापडलं आहे. विश्वाचं रूप जसं अचाट आणि अगाध आहे तसं माणसाचं शरीर आणि मन हीसुद्धा माणसासाठी कोडीच आहेत.

भाग १ – प्रस्तावना Read More »